Tuesday, May 25, 2010

मराठी हास्यकट्टा 35

नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा
****************

नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ?
नवरा : अफ्रीकन सफारीला
नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?
नवरा : मी तुला अफ्रीकेहून परत आणेन
****************
प्रियकर प्रेयसीला प्रेमाने म्हणाला, "ते बघ ते झाड"..आणि मग..मग काय...प्रेयसी झाडू लागली
****************
Kareena kapur ani tushar kapur eka building chya top,mhanje 13th floor var rahat astat. dusre sagle actors 1st te 12th floor var rahtat. sagle lift vapartat. pan tushar kapur ani kareena kapur nahi vaparat.... kaa???

karan.. 'Jeena sirf mere liye'
****************
कर्वे रोडला पाणी येते,
पण कोथरुडला नाही येत. का बरे ?कारण वाटेत नळ स्टॉप आहे..
****************
गोट्या : काय हो तुमच्या कडे "मारुती" चे स्पेअर
पार्ट्स विकत मिळतात का??दुकानदार : हो...गोट्या : मग मला एक "गदा" द्या..

****************
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!
****************
बंड्या: आई ..आई, बाहेर एक मिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत...
****************
गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?*
*मंजू : झेब्रा.*
*गणपुले सर : असं का बरं?*
*मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना*
****************
चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.*
*बंटू : अरेरे बिच्चारी.*
*चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.*
*बंटू : तुला कसं रे कळलं.*
*चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझीचप्पल करकरीत नवीन आहे.*
****************
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर
१०० रुपयाला काय मिळेल?:::::::फुल भाजी

****************
एक बाई दुसर्या बाईला विचारले
प.बा.:तुम्ही गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला

May 25, 2010 at 2:39pm

0 comments: