Sunday, March 20, 2011

होळी

रंगपंचमी !! 

लाल,गुलाबी,निळा ,पिवळा
राधे यात तुझा रंग खुळा
ये अशी भिजून जा माझ्यासवे
रंगवतोय तुझ कृष्ण निळा

...लपशील अशी कुठवर सखे
न खेळता होयील विरंगगुळा
नको करू वोढाताण अशी
तुटून जायील तो हिरवा चूडा

जा कृष्णा मज नको छेडू
तू निळा माझा रंग गोरा
गोपिका माझ्यासंगे
आम्ही जिरवू तुझा तोरा

उधळू रंग असे कृष्णा
तू करशील पोबारा
रंगणे तुझे आम्हाकडून
बघेल गोकुळ सारा

जा जा राधे तू पळशील कुठवर
आज ना सोडणार तुला
प्रेम रंगाचे रंग घेवून मी
ये अशी झुलवू हा प्रेम झुला

ना ना कृष्णा तू सोड मला
पहा नको करू हा गुन्हा
राहू दे प्रेम रंग असाच आपला
मी गोरी राधा तू निळा कान्हा.
-अनामिक