Tuesday, January 3, 2012

पहाट

पहाट
साखर झोपेत असतानाच दार वाजल खटखट
उघडूनपाहतो तर काय समोर उभी होती पहाट
झोपतोस काय ?उठ बाहेर ये सृष्टी बघतेय वाट
वर बघ आकाशी सूर्यदेवांनी पसरलाय ताम्रपट
बागेमध्ये उमललेल्या मस्त फुलांना हळूच बघ
... मखमली ओल्याशार गवतावर अलगद टाक पाय
मायेने फिरव त्याच्यावर हात ,बाळाच्या जावलावर
हात फिरवल्याचा मिळतोय न आनंद .............
चिमण्यांचा चिवचिवाट,अन पक्ष्यांचा किलबिलाट
ऐकून तृप्त करू घे कान ,चल लवकर सृष्टी बघतेय वाट
दूरवरून येतेय बघ कानावरऐकू येतीये मंदिराची घंटी
अरे ऐकतोस काय नुसता देणा तुही साथ वाजवत टाळी
कुठेतरी गात आहे,देवाच्या सृष्टीचीच भाग असणारी "लता"
..........................................................रामाची भूपाळी
ताजा -तवान्या श्वासाने भरून घे तुझ पोट ,दिवस भर
तन मन दिवसभर मग राहील कस प्रफुल्लीत .......
ये बाहेर ये सृष्टी बघतेय रे वाट ........................
-अनामिक

0 comments: