Thursday, January 12, 2012

मराठी हास्यकट्टा 38

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची
उत्तरे दिली पण स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला," अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच लागेल."
सुरेखाबाई," त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?"
प्रगणक," होय."
सुरेखाबाई,"तर लिहून टाका ना तेवढेच."
आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले "कावळ्या ईतके "
******************
शाळेतल्या आणि कॉलेजच्या जीवनातील
फरक:
शाळेत उशीर झाला तर शेवटच्या बेंचवर
बसावं लागत होत..
आणि कॉलेजला उशीर झाला तर
पहिल्या बेंचवर बसावं लागत.......
:)
******************
राहुल बाबा यूपी के एक स्कूल मे "नौटंकी विजिट" पर गए ..
बच्चो से पूछा टीचर कहा है ?
बच्चे - टीचर तो कभी आते ही नही है ..
राहुल - फिर स्कूल कैसे चलता है ?
बच्चे - जैसे आप देश चला रहे है !!
******************
एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत बसला होता.
समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो,
काय रे हीच का आपली संस्कृती ?
मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.
******************
एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत बसला होता.
समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो,
काय रे हीच का आपली संस्कृती ?
मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.
******************
एका स्टेशन वर ट्रेन थांबते ..
प्रवासी : कोणते स्टेशन आहे ?

स्टेशन वरचा माणूस : अरे टवळ्या , बाहेर येऊन बघ की स्वत : .. आळशी नुसता
बसल्या जागी पाहिजे सगळं .. डोळे फुटले का तुझे ?
....
.
प्रवासी : अरे वा पुणे आलं की !
******************
पुणेरी झटका
एक माणूस पहिल्यांदा पुण्यात येतो आणि एका पुणेरी माणसाला विचारतो - अहो इथे शनिवार वाडा कुठे येतो ?
पुणेरी माणूस - हे पहा, इथे शनिवार वाडा येत नाही, तुम्हालाच तिथे जावे लागेल.
******************
विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!!
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!!
******************
सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली कि
, कॉलेज कसं ' विधानसभेसारख' वाटत
आणि ती मुलाकडे पाहुन हसली कि
त्याला बिनविरोध "आमदार" झाल्यासारख वाटत,
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि
मुख्यमंत्री झाल्यासारख वाटत' आणि
लग्नाला एक वर्ष झालं कि मग
.
.
.
.
.
.
.
.
.
आदर्श घोटाळा केल्यासारख वाटतं
******************

0 comments: