Tuesday, April 21, 2020

लेख १

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला साष्टांग नमस्कार ! ! 
नमस्कार बंधूंनो,
आज एक खूप सुंदर अनुभव आला. संघ कार्याचा हा महिमा असेच म्हणावे लागेल.

विलेपार्ले ला एक ८५+ वयाचं मुजुमदार नावाचं जोडपं रहातं . त्यांच्या मुलीने त्यांना जेवणाचा डबा लावून दिला  आहे .डबा आणि इतर सहायता म्हणून एक नर्स लावून दिली आहे. इथे त्यांचं दुसर कोणी नाही. ५२ वर्षाचा मुलगा आहे पण तो अधू आहे.  मुलगी अमेरिकेत आहे.

कोरोना प्रकरणात डबा पोचला नाही, नर्स पोचली नाही म्हणून मुलगी काळजीत. तिने तिथल्या संघाच्या कार्यकर्त्याला काही मदत करता येईल का ते पाहावे असे सांगितले. ज्याला सांगितले तो अमेरिकेतील कार्यकर्ता माझ्या नागपूरच्या आदित्य नावाच्या एका स्वयंसेवक बंधूचा मित्र आहे. आदित्य त्याला म्हणाला," बघतो". आदित्य ने मला फोन केला की असं असं आहे काय करता येईल. त्याला सांगितले की मी बघतो. काल उशीर झाला होता, रात्री पावणे बारा वाजले होते, म्हणून पार्ल्या च्या कार्यकर्त्याचा नंबर कसा मिळवायचा ह्या विचारात असताना, तिकडे जर्मनी मध्ये फ्रॅंकफर्ट चा मुख्यशिक्षक, आदित्य नावाचाच  संघाचा एक कार्यकर्ता आहे जो की मूळ चा विलेपार्लेचा आहे त्याची आठवण झाली. शिवाय जर्मनी वेळेनुसार तीकडले संध्याकाळचे सव्वासातच झाले होते म्हणून त्याला व्हॉटसअप कॉल वर सांगितल की मला पार्ले च्या कार्यकर्त्याचा नंबर देऊन ठेव, अशी अशी मदत हवीये. त्याने नंबर दिला, श्री जयेश शाह पार्ले सहकार्यवाह. मी म्हंटलं," मी उद्या त्यांच्याशी बोलतो तू तूर्तास मेसेज पाठवून ठेव त्यांना".

आता आज त्यांना फोन करणारच होतो, तर त्यांचाच मला मेसेज आला की *काम फत्ते*. श्री दिलीप सोनी नावाचे पार्ल्याचेच स्वयंसेवक त्यांच्या घरा जवळच्याच सोसायटी मध्ये  राहतात. त्यांनी त्यांची जाऊन चौकशी केली आणि त्यांना आश्वस्त केलं. त्यांनी व्हिडिओ पण बनवून पाठवला.

विलेपार्ले...अमेरिका...नागपूर...दादर... फ्रॅंकफर्ट...विलेपार्ले अस वर्तुळ पूर्ण झालं.

मस्त वाटल. संघ स्वयंसेवकांचं जाळं किती मजबूत विणलं गेलंय ते पाहून धन्य वाटलं.

प्रद्युम्न गाडगीळ.

0 comments: