Sunday, July 11, 2010

उखाणे-1

उखाणे


अंधाऱ्या रात्री चांदणी फ़क़्त चंद्राची
रात्रीच काय .... दिवसा सुद्धा मी फ़क़्त तुझी




भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
रावांच्या मिठित विसरते मी माहेर


श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी


चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,
--- रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा.


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट


हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे


रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ------- ची जोडी
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला


कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित


वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.




साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला




सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा.


नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी


श्रावण जलधारांनी शांत होते धरती,
..... च्या पुढे कर माझ्हे जुऴती


वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
..... चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते


भाजीत भाजी मेथीची,
.....माझ्या प्रितीची.


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात


रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.


श्रावणात बरसतात धुंद जलधारा,
.....च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा.


हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,
..... च्या जीवनात सदैव मिळो शांती.


अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.


धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
..... च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते


भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.


आज आहे श्रावणी पोळा,
..... च्या जीवावर शृंगार केले सोळा.


अश्वीन प्रतिपदेला देवीचे बसता घट,
..... नी आमलाय माझ्याकरिता सोंगट्यांचा पट.


श्रावण महिन्यात वाजतगाजत येतात गौरी गणपती,
....चे नाव घेते ते आहेत माझे प्रेमऴपती.

0 comments: