Monday, July 18, 2011

मराठी हास्यकट्टा 24

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!

*******************
चंगू : अभ्यासाच्या प्रवासात आपण फक्त चालत राहायचं असतं.. चालत राहायचं असतं..

मंगू : असं का रे?

चंगू : कारण ' वाट ' तर लागलेलीच असते...

*******************

एक मुलगी चेहऱ्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवर उभी असते.
तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,
"ए, आती क्या खंडाला?"
... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"

*******************
शिक्षक : अशी कल्पना करा की, तुम्ही कोट्यधीश आहात आणि तुमचे आत्मचरित्र लिहा.

शिक्षक : गंपू, तू का लिहित नाहीस?

गंपू : सेक्रेटरीची वाट बघतोय!!
*******************
गुरुजी - बाळू काल तुझ्यासोबत ते सभ्य गृहस्त कोण होते ?
.
.
.
.
... .

बाळू - गुरुजी ते कोणी सभ्य गृहस्त नव्हते ते माझे वडील होते.
*******************
संता : वहिनींचं नाव काय रे?
बंता : गुगल कौर

संता : का रे?

बंता : अरे कारण तिला एक प्रश्न विचारला की ती किमान दहा उत्तरं देते.
*******************

गंपू : डॉक्टरसाहेब, तुमची नर्सच्या हाताला गुण आहे.
तिचा हात लागताच मी खडखडीत बरा झालो.
डॉक्टर : माहिती आहे मला... थप्पडीचा आवाज बाहेर ऐकू आला...

*******************
मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.

खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.

पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!' तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'

उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?'
*******************
बागेतल्या बाकावर एक माणूस कुत्र्यासह बसला होता. गंपू त्याच्याजवळ गेला.

गंपू: तुमचा कुत्रा चावतो का?

माणूस: नाही.
...
गंपू येऊन बाकावर बसतो न बसतो तोच तो कुत्रा त्याला चावतो.

गंपू: तुम्ही म्हणालात तो चावत नाही.

माणूस: हा माझा कुत्रा नाही!
May 22 at 7:32pm

0 comments: