Sunday, July 17, 2011

अमृतवेल -वि . स . खांडेकर

अमृतवेल -वि . स . खांडेकर


प्रत्येक मनुष्याचं जीवन हे एका वेली सारखं असत,वेल, अशी वेल कि ज्यावर गुणदोषांची फुले बहरलेली असतात,जशी जशी वेल वाढत जाईल तसं तसं एक एक गुणदोषांच फुल वाढत जात,करुणा,प्रीती,नम्रता,स्वाभि​मान,क्षमा,प्रेम,निस्वार्थत​ा, या गुणांच्या वर अहंकार, गर्व, स्वार्थ,वासना,अभिमान,राग,आत्मप्रौढी,अहंमपणा,मोह,द्वे​ष अशा दोषांच कवच नकळत असे बनत जात असते.

त्या कवचांमुळे माणूस स्वतःला हळूहळू हरवून बसतो,त्या साधारण वेलीच रुपांतर मग एका विषवल्ली मध्ये होते आणि त्यालाच माणूस खंर जीवन मानायला लागतो,त्या वेलीवर गुणांच्या भोवती असलेल्या दोषाच्या कवचालाच तो खंर फुल मानून त्याचा सुगंध घेत राहतो.तो स्वतःला बाह्य जगात हरवून बसतो.

पण जीवनात कधी कधी काही अशी वादळ येतात कि त्या वेलीला गदगदून हलवून टाकतात, त्या वादळात दोषांची ती कुचकामी कवच गळून पडतात, त्याचं ते तकलादू आवरण त्या वादळाची सामना करायला असमर्थ ठरते.मग ती वेल पुन्हा स्वतःला शोधायचा प्रयत्न करते,मनुष्याचे त्या उघड्या पडलेल्या गुणांकड लक्ष जाऊन त्यांचा तो अर्थ जाणण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा त्याला ती जीवन रुपी वेल नव्याने कळू लागते, उमलू लागते,माणूस स्वतःला सापडण्याचा प्रयत्न करू लागतो, मग या वेलीवर करुणा उमटते,मैत्री फुलते, मनुष्य आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो.

तेव्हा त्या वेलीच रुपांतर अमृतवेलीत होत.

आणि एकदा तीच रुपांतर अमृतवेलीत झालं कि त्यावर आलेल्या गुणांच्या फुलांना कुठल्याही कवचाची आवश्यकता भासत नाही कारण ती फुलं कुठल्याही वादळात टिकून राहतात.

"रागच कवच फुटून क्षमा बहरते, स्वार्थ जाऊन निस्वार्थ भावना येते,गर्व संपतो नम्रता येते, अभिमान जाऊन स्वाभिमान,द्वेष जाऊन करुणा,वासना जाऊन प्रीती येते तेव्हा त्या वेलीला एक नवीन अर्थ प्राप्त होतो, तो अर्थ अमृतवेल असतो."

0 comments: