Wednesday, August 24, 2011

२४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती

२४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती

 

आज २४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती. हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत महाराष्ट्राचा ध्वज दिमाखाने फडकावणाऱ्यांपैकी ते एक होत. हिं.स.प्र.से. मध्ये भगतसिंग यांना रणजित तर राजगुरूंना रघुनाथ वा एम या सांकेतिक नावाने ओळखले जात असे.

शिवराम हरी राजगुरू (२४ ऑगस्ट, इ.स. १९०८; खेड, महाराष्ट्र - २३ मार्च, १९३१; लाहोर, पंजाब) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते.

राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे २४ ऑगस्ट, इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. नंतर त्याचे राजगुरु असे नामकरण करण्यात आले. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.

लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले.

सौजन्य : Hutatma Shivaram Hari Rajguru
दिनांक २३ मार्च १९३१ रोजी राजगुरूंना वयाच्या तेविसाव्या वर्षी हौतात्म्य प्राप्त झाले.
त्यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

1 comments:

Unknown said...

Thanks for sharing