Saturday, August 6, 2011

आजच्या क्षणांमध्ये जगण्यातच खरा आनंद असतो !!

 आजच्या क्षणांमध्ये जगण्यातच खरा आनंद असतो !!

आज देखणेपणावर जाऊ नका,सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

*********************
श्रीमंताला भुलू नका,'आलेल्या ' पैशाला 'जाण्याच्या' वाटा पटकन सापडतात .
जी व्यक्ती तुमच्या चेहर्‍यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला
अर्थ देऊ शकते.

***********************

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,तरी तुमच्या स्वप्नाचा ध्यास सोडू
नका.करावीशी वाटेल, ती प्रत्येक गोष्ट करून पाहा.जिथे जावंसं वाटेल ,तिथे
जा . आयुष्य एकदाच मिळतं .आणि संधीही पुन्हापुन्हा येत नसते.
*********************

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून ,खोडून टाकत आहे, काल
आणि उद्या.
*********************

कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं;पण मी आज जे करेन त्यावर माझा
उद्या आकाराला येईल, हे मला समजलं आहे.
*********************

आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस
माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.
*********************

आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल. उद्याचा
सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री ?
*********************

आज मी हरणार नाही. मागे पाहाणार नाही, अश्रु ढाळणार नाही,एकही संधी हातची
जाऊ देणार नाही. आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
उत्तम गुंतवणूक करीन :वेळ
*********************

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पुर्ण करीन, निदान एक अडथळा
ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन .
********************

आज मी चिडणार नाही, वैतागणार नाही, धुसफुसणार नाही. मनावरचं निराशेचं मळभ
हटवून आज मी प्रसन्न हसेन.
*********************

आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन. आणि आकाशात नजर लावून तिथे
चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन .
*********************

आज निदान एवढं तरी मी करीनच.!

0 comments: