Tuesday, February 27, 2024

मराठी भाषा दिन ९

आज काल मराठी पालक इंग्रजी संस्कार करतात म्हणून मुलं ही इंग्रजी मध्ये कविते मध्ये आपल्या  भावना व्यक्त करताना दिसतात! भाषा आणि संस्कृती  जिवंत ठेवण्याचं काम शहरांपेक्षा जास्त ग्रामीण भाग करत आला आहे आणि पूढे ही करेल ! मराठी भाषा चिरायू होवो ! गुजरात मध्ये संमेलन होतं नाहीत तरी तिथली लोकं गुजराती मध्ये संवाद करतात हे इतर भाषिकां कडून शिकायला हवं! इंग्रजी भाषा आहे आणि भाषेचे वर्ग असतात त्यासाठी इंग्रजी ची माध्यम कशाला हवीत हा  मूळ प्रश्न आहे?? इतर परकीय भाषा शिकतोच की त्यांची माध्यम कुठे असतात ! मराठी शाळेचा प्रश्न लवकर सुटो एवढीच अपेक्षा आहे! 

विद्या 
 #vidyamslife 

0 comments: