Wednesday, March 7, 2012

चारोळ्या



आयुष्यात खुप काही हव असत
हव तेच मिळत नसत
हव तेच मिळालं तरी कमी असत
कारण चान्दन्यानी भरून सुद्धा
आकाश नेहमी रिकामच असत.

---------------
आकाशाला गवसणी घालणर्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!
---------------
नजरेत नजर मिसळून बघ
सख्या शब्दांची तुला खाण दिसेल.
एक-एक शब्द उघडून बघ
इंद्रधनूची कमान हसेल .
 ---------------
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात...
. एक पुढे नि एक पाय मागे..
पुढच्याला गर्व नसतो....
मागच्याला अभिमान नसतो...
कारण त्याला माहित असत.....
क्षणात हे बदलणार असत...
याचंच नाव जीवन असत .......

--------------
आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका, दुसऱ्यासाठी जगा.
दुसऱ्यासाठी जगल्यावर आपली दुःखं संपून जातील.
यासाठी आपल्या काळजातील "आई' जपून ठेवा
* सिंधुताई सपकाळ *
--------------
लिहता लिहता जपावे ते अक्षर मनातले
रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले
बोलता बोलता गूंफावे ते शब्द ओठातले
हसता हसता विसरावे ते दु:ख जीवनातले
--------------
एक तरी नात असाव, मनापासून मनाला पटणार,
मैत्रीच्या पलिकडे, प्रेमाच्या अलीकडे,
रुनानुबंध जपणार....!!!

0 comments: