Sunday, May 8, 2011

मराठी हास्यकट्टा 24

रुग्ण : डॉक्टर,वाहन चालविण्याची परीक्षा असते, त्यावेळेस मला कापरं भरतं.
डॉक्टर : काही काळजी करू नका! तुम्ही या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण व्हाल!
रुग्ण : अहो,पण मी विद्यार्थी नाही, परीक्षक आहे !

*****************
५ वीच्या वर्गात नवीनच प्रवेश घेतलेल्या बाळूला वर्गात शिक्षकांनी विचारलं तुझं नाव काय?
बाळू.....वडिलांचे नाव?....प्रशांत .
वडील काय काम करतात ?
बाळू प्रांजळपणे म्हणाला, 'आई जी काही कामे त्यांना सांगते ती सर्व कामे ते मुकाटपणे करतात.'
*****************

गुरुजी -सांग बाळू शेजारी म्हणजे कोण?

बाळू- डावीकडचे बाजुवाले म्हणजे सारखे उसन्या वस्तू मागायला येणाऱ्या बाई .

आणि उजवीकडचे बाजूवाले म्हणजे काम नसताना घरात डोकावणाऱ्या बाई ...

*****************
गुरुजी : इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ काय?
.
.
.
.
बंडू : याचा अर्थ रस्ता चुकीच्या ठिकाणी बनवला गेलाय.

*****************
चारोळ्या

सौदर्य :
मेकअपच्या ढगाआड

... तिचा चेहरा लपला होता

सौंदर्याचा अटाहास तिने

पैशामुळे जपला होता !!
*****************
संपतराव आपल्या
पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज अजूनं माझ्या पॅंटच्या खिशातले काही
पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
.
पत्नी : कमाल आहे तुमच्या
... अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून
तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?...
.
संपतराव : तू नक्कीच खिशात हात
घातलेला नाहीस, कारण त्यात ... अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
*****************
वकील : चोरी करताना स्वताच्या बायको मुलांचा विचार तुझ्या मनात नाही आला?

चोर : विचार आला होता साहेब, पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचाच समान मिळत होत..

*****************
वॉर्डबॉय : सर, काल सगळे कैदी रामायण करत होते.
डॉक्टर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
वॉर्डबॉय : नाही सर
डॉक्टर : नाही ? काय झाले.
वॉर्डबॉय : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

*****************

एक मुलगा देवाला विचारतो, 'तिला गुलाबाचं फूल का आवडतं?? ते तर एका दिवसात मरून जातं. मग तिला मी का आवडत नाही? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो....' देव उत्तर देता, 'लई भारी रे.... एक नंबर डायलॉग!!'

*****************
गंपू : ही एसटी नॉ नस्टॉप आहे ना?
कंडक्टर : हो... का?
.

.
गंपू : माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय... मला भीती वाटतेय चुकून परत येईल की काय!!!

0 comments: