Sunday, May 29, 2011

पु.लं चे किस्से

 पु.लं चे किस्से 

काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.

गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ’ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
‘ आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ‘ गणपतीपप्पा ’ झाल्यासारखा वाटतो ’

----------
पुलंच्या लहानपणाचा एक प्रसंग.

पुलं तेव्हा चौदा पंधरा वर्षांचे होते. लोकमान्य सेवा संघात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर होणा-या प्रश्नोत्तरात शाळकरी पुरुषोत्तमनं प्रश्न विचारला. त्या काळी भारतानं फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये यावर चर्चा चालू होती. तर पुरुषोत्तमनं तात्यासाहेबांना विचारलं की फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये ?
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं,
‘ स्वीकारू नये, पण राबवावं. ’
यावर पुरुषोत्तम म्हणाला, मला आपलं उत्तर कळलं नाही.
त्यावर तात्यासाहेब म्हणाले, ‘ आपल्याला कळेल असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा. ’
त्यावर पुरुषोत्तमांनी तात्काळ प्रश्न विचारला
‘ पुण्याला सध्या अंजिरांचा काय भाव आहे ?’

----------
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ‘ बॉक्स मिळेल का ?’ म्हणून विचारलं.
‘ हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ’ दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ‘ अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.

---------
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. 'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

---------------------
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी (साडी ऎवजी)पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"

0 comments: