Saturday, May 28, 2011

पु.लं. चे काही किस्से !!!


एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!

पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?

पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" घरात हशा पिकला होता !

डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.

"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."

स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे".

0 comments: