Sunday, May 8, 2011

आयुष्य म्हणजे एक अथांग प्रवास

आयुष्य --एक अथांग प्रवास
 
 
आयुष्य म्हणजे जन्मापासून सुरू होणारा एक अथांग प्रवास आहे. मृत्यूच्या किनार्‍याला लागल्यावरच आपण कूठून काय कसा प्रवास केला त्याचा माणसाला थांग लागतो. या अनोळखी जगात जन्म घेऊन आपण आपली होडी पाण्यात सोडली की मग अनपेक्षित वादळं येणारच. मन हेलकावून टाकणार्‍या लाटा येणारच. अपेक्षाभंगाच्या वीजा कडाडणारच आणि दु:खाचा सरी पाऊस बनून कोसळणारंच. वादळाविना आयुष्याचा सारा प्रवास झाला तर मग जन्माला आल्यावर आपण आपली होडी समुद्रात नाही तर डबक्यात सोडली होती असं समजायला काहीच हरकत नाही. कारण वादळं नेहमी समुद्रात येतात. डबक्यात नाही. आयुष्यात वादळं आल्यावर ते कधी निघून जाईल त्याची घाबरून वाट पहात बसणारे हमखास वादळात वाहून जातात. या जगात पावसाच्या तालावर ज्यांना नाचता येतं त्यांना कोणतं वादळ कधी वाहून नेऊ शकत नाही. आयुष्य ही वादळाला घाबरत जगण्याची गोष्ट नाही आहे. तर पावसाच्या बेभान, बेधुंद सरींवर तोल न ढळू देता कसं नृत्य करावं हे शिकण्याची गोष्ट आहे.

0 comments: