Wednesday, March 14, 2012

मराठी हास्यकट्टा 41

एक कर्मचारी आपला बॉस पगार
वाढवत नसल्याने खूपच
वैतागला होता.
.
.
... .
.
वेगवेगळ्या युक्त्या वापरुन
पहिल्या, पण काहीच उपयोग
झाला नाही.
... .
.
.
.
शेवटी तो बॉसला म्हणाला, "हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की, तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून."

********************
हाईट ऑफ फेसबुक addiction :

मुलाचे स्टेटस :
इन लेक्चर..
~~~

लेक्चरर त्यावर कॉमेंट मारतो :
गेट आउट ऑफ द क्लास

~~~

प्रिन्सिपल : लाईक्स द कॉमेंट


********************
चित्रगुप्त यमाला : महाराज मी असे सॉफ्टवेर बनवले आहे की धरती वर एकदा पाप झाले की स्वर्ग मधे एक धमाका होइल .
एक दिवस स्वर्गा मधे सगल्या ठिकाणी जोराचे धमाके होत

यम : हे काय चालू आहे चित्रगुप्त ?
चित्रगुप्त : महाराज बहुतेक 10 वीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत वाटत

********************
झंप्याची बायको - कुठे आहेस रे?

झंप्या - अगं तुला त्या ज्वेलर चं दुकान आठवतं?
ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता आणि मी बोललो होतो कि एक दिवस तुला हा हार नक्की घेऊन देईन..

... झंप्याची बायको (अफाट खुश होऊन) - हो हो जान !! आठवतं ना...

झंप्या - बस त्या दुकानासमोर सामोसे खातोय..येतो १० मिनिटात...:P
********************

संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते....
मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज
आहे सध्या.....
..
... .
.
आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला.....
.
.
( मुलगी Shocks... आई Rockks )
********************

0 comments: