Sunday, October 2, 2011

मराठी हास्यकट्टा 10

बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.
चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.
चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'

********************

गंपू : तव्यावर ठेवल्यावर पॉपकॉर्न ताडताड का उडतो?
झंपू : स्वत: बसून बघ, मग कळेल!!
October 3 at 6:22pm
********************
जगात अशी कुठली गोष्ट आहे कि जी तुमच्या विचारांना शब्दात बदलवते ?
?
?
?
?
... ... ?
?
?
?
?
?
?
अहो दारू
********************
सगळ्या सरदारांना अजुन पर्यंत समाजल नहीं की...
.

.
" अन्ना हजारे ने इतके दिवस तर कही खाल्लेल नहीं.
.
.
.
पण तरी ते बिल कशाच मागत आहे.?".
********************
बायको : अहो, खर सांगा ना.
नवरा : काय ?
बायको : तुम्हाला कधि असं वाटलं कां, जर माझ लग्न दुसऱ्या कुणाशी झालं असत तर.........
नवरा : नाही, मी कुणा बद्दल असा वाईट विचार करत नसतो... :)
********************
मलिंगाची आई : "बाळा, जरा केस कापून ये!"
मलिंगा : "का ग, आई ?"
.
.
मलिंगाची आई : "पितळेची भांडी घासायची आहेत, काथ्या संपला आहे!".....
********************
ऑपरेशन झाल्यावर पेशंट डॉक्टरला विचारतो की, डॉक्टर साहेब मी आता पूर्ण बरा झालो आहे ना!
समोरून उत्तर येते, बेटा डॉक्टर साहेब भूतलावर राहिलेत, मी तर चित्रगुप्त आहे!!!!!! :) :)

********************

पती : अगं ... महागाई खूप वाढलीय . यावेळी तू
तुझ्या बर्थडेसाठी जरा कमीच खरेदी कर .
पत्नी : बरं ... मी यावेळी केकवर लावण्यासाठी ४० च्याऐवजी २५च मेणबत्त्या घेईन .

********************
परीक्षा सुरू असते. सगळी मुलं भरभर पेपर लिहित असतात. एकटा गंपू प्रचंड टेन्शनमध्ये असतो. शिक्षक त्याच्याजवळ येऊन विचारपूस करू लागतात..
शिक्षक : काय रे, टेन्शन आलंय का?.... रोल नंबर विसरलास का?... पेन नाहीये?... की, कॅलक्यूलेटर राहिलं घरी??
गंपू : गप्प बसा ओ.... मी चुकीच्या विषयाची चिट आणलीये आणि तुम्हाला पेन-पेन्सिलचं पडलंय....

********************

डॉक्टर : (पेशंटला) दिवसातून रोज दोन-तीन किलोमीटर पायी चालत फिरा. तब्येत चांगली राहील.
पेशंट : काही फरक पडत नाही. दुसरं काही सांगा. मी पोस्टमन आहे.
********************

एक मालवणी गृहस्थ देवळात जातात.
गृहस्थ : यंदा माझी बायपास झाली असा. तो नवस फेडाक इलंय. जरा जोरदार गाऱ्हाना होऊ द्या.
पुजारी : देवा म्हाराजा, यंदा यांची बायपास झाली हा, तशी दरवर्षी होऊ दे रे म्हाराजा...!

********************
गंपू : प्रिये, तू माझ्या हृदयात, श्वासात, स्वप्नात राहतेस....

गर्लफ्रेण्ड : नाही रे... मी अंधेरीत राहते!

0 comments: