Sunday, October 30, 2011

मराठी हास्यकट्टा 3

मुला कडचे : आम्हाला स्थळ पसंद आहे . मुली कडचे : पण , अजून आमची मुलगी शिकत आहे . मुला कडचे : मग आमचा मुलगा काय लहान आहे , पुस्तक फाडायला .... :)

******************

प्रवाहा बरोबर तर सगळेच जातात.
प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच जिवनात यशस्वी होतो…
हे मी ट्राफीक पोलिसला सांगितल,
तरी त्याने पावती फाडलिच. :)

******************

मास्तर:- बोल बंड्या बिरबल कोण होता माहित आहे का?
बंड्या:- नाही माहित सर ?
मास्तर:- गधड्या अभ्यास केला असता तर माहित पडल असत. …….
बंड्या:- सर तुम्हाला माहित आहे का? सचिन,रोहित आणि प्रथमेश कोण आहेत ते?
मास्तर:- मला नाही माहित ?
… … …
बंड्या:- कस माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवला असत तर माहित पडल असत

******************

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..
... ...
बायको :-विचार करा ..
द्रौपदीला ५ नवरे होते..
नवरा :- माफ कर ...
गम्मत केली ग :)

*************

दिग्विजय सिंग एकदा नेट सर्फ़िंग करत होते.
अचानक त्यांनी घाबरुन आपले ब्राऊझर बंद केले.
.
..
.
कारण जवळपास प्रत्येक वेबपेजवर RSS FEED असा option येत होता !!!!!

******************

मुलगा - आपली कालच मैत्री झाली आहे. आता तू माझ्याकडे 'त्या' नजरेने बघायला सुरुवात कर.
मुलगी - 'त्या' म्हणजे कोणत्या रे?.......
मुलगा - ते तुलाच माहित आहे. कारण काही काळानंतर मी जेंव्हा तुला प्रपोज करेन
तेंव्हा "आपण तर चांगले मित्र आहोत. मी तुझ्याकडे 'त्या' नजरेने कधी
बघितलेच नव्हते." असे उत्तर मला नकोय. BCOZ
˙٠•●♥♥" FRIENDSHIP IZ THE 1ST STEP OF LOVE "♥♥●•٠˙
मुलगी - पण मी तर तुला कालपासूनच त्या नजरेने पहातीये...♥

0 comments: