Wednesday, October 26, 2011

मराठी हास्यकट्टा 11

अमेरिका : आमची कुत्री फुटबॉल खेळतात.
जपान : आमचे मासे नृत्य करतात.
चीन : आमचे हत्ती सायकल चालवतात.
भारत: आमची गाढवं देश चालवतात...

*************

झम्प्या बोड़ीस्प्रे मारून बसमधे चडला
एका मुलीने कमेंट्स पास केलि - आज काल फिनेलचा वापर जास्त होतोय ना .....?
झम्प्या - तरी पण माश्या काही पाठलाग नाही सोडत.. :-D


*************

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,
एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला
"मग आम्ही काय करू"-पलीकडून उर्मट प्रश्न आला
"तुम्ही काही करू नका" - अत्रे शांतपणे म्हणाले,
मृतांच्या नातेवाईक यांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच.......

*************

मुलगी एका गाडीतून
एका मुलाला ओव्हरटेक
करते.
मुलगा : (जोरात ओरडून )
ए....... म्हैस.
मुलगी : तू गाढव... मूर्ख...
बिनडोक..
एवढं बोलत असतानाच
तिची गाडी एका म्हशीला धडकते
आणि अपघात होतो.
.
.
.
तात्पर्य :
मुलींना त्यांच्या भल्याचं
सांगितल तरी कळत
नाही..................


*************

पुणेरी बॉय फ़्रेंड :-

मुलगी : आपन मेक डोनॉल्ड ला जाऊ या का ? मला खुप भूख लागली आहे..
मुलगा : पण मझी एक आट आहे, मला मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग मग जाऊ...!!
...
मुलगी थोडा वेळ विचार करून बोलते, जाऊ दे ना आपन " के एफ़ सि " ला जाऊ...!!
मुलगा हुशार आसतो तो तिला विचारतो मला जरा " के एफ़ सि " चा फ़ुल फ़ॉर्म सांग मग जाऊ....!!
मुलगी : आपन ना मीसळ पावच खाउ खुप छाण मीळतो...

**************
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!'
October 26 at 8:47pm

0 comments: